* कविकुलगुरु
कालीदास, भवभूती
व राजशेखर
अशी उज्ज्वल
साहित्य परंपरा
विदर्भाला लाभली
आहे. राजशेखरच्या
बालरामायणातील
एका श्लोकाच्या
शेवटच्या चरणातील
'विदर्भ विषय:
सारस्वती जन्मभू:'
म्हणजे विदर्भ
प्रांत हा विद्येचे
माहेरघर आहे
असे राजशेखरने
लिहिले आहे.
ह्या परंपरेचं
जतन विदर्भ
साहित्य संघानी
केलं आहे.
* आधुनिक काळात
'स्वामी चक्रधर,
गॊविंदप्रभु,
महदाइसा, गुलाबराव
महाराज, तुकडोजी
महाराज, गाडगेबाबा,
डॉ. पंजाबराव
देशमुख, ताराबाई
शिंदे यांनी
ही परंपरा अक्षुण्ण
ठेवली.
* विदर्भ साहित्य
संघाची स्थापना
१४ जानेवारी
१९२३ रोजी अमरावतीस
झाली.
* विदर्भ साहित्य
संघाची स्थापना
अमरावतीची.
संस्थापक होते
कविवर्य अण्णासाहेब
खापर्डे. कालांतराने
विदर्भ साहित्य
संघाचे कार्यालय
नागपूरला आले.
* विदर्भ साहित्य
संघाचे स्थानांतरण
नागपुरास झाले.
अध्यक्ष कै.
ग. त्र्यं.
माडखोलकर यांनी
शासनाकडून उत्तर
अंबाझरी मार्ग,
सीताबर्डी येथील
जागा मिळवली.
२० ऑक्टोबर
१९५० मध्ये
कै. भाऊसाहेब
माडखोलकर यांच्या
हस्ते भूमिपूजन
झाले. विदर्भ
साहित्य संघाच्या
नागपुरातील
नवीन वास्तूचे
उदघाटन भूतपूर्व
राष्ट्रपती
आदरणीय महामहीम
डॉ. राजेंद्रप्रसाद
यांचे हस्ते
झाले.
* विदर्भ साहित्य
संघाला ८३ वर्षाची
साहित्य परंपरा
लाभली आहे.
या कालावधीत
डॉ. बाबासाहेब
आंबेडकर, मा.
अट्लबिहारी
बाजपेयी, श्री.मधू
दंडवते, मा.
ग्यानी झैलसिंग,
न्यायमूर्ती
हिदायातऊल्लाह
यांसारख्या
अनेक मान्यवरांनी
विदर्भ साहित्य
संघाला भेटी
दिल्या.
* आज विदर्भ
साहित्य संघाचं
कार्य विस्तृत
झालं आहे. विदर्भातील
११ जिल्ह्यांचं
प्रतिनिधित्व
विदर्भ साहित्य
संघ करतो.
विदर्भ साहित्य
संघाच्या विदर्भात
एकूण ५५ शाखा
असून विदर्भ,
महाराष्ट्र
आणि परदेशात
मिळून ६०००
सदस्य संख्या
असलेली ही
एकमेव संस्था
असावी.
* साहित्य संघ
आणि साहित्य
संघांच्या शाखांच्या
माध्यमातून
अनेक साहित्यिक
उपक्रम राबविले
जातात. ज्यात
अनेक मान्यवर
साहित्यिकांची
व्याख्याने,
कविसंमेलने,
चर्चासत्रे,
विविध स्पर्धा,
तसेच विदर्भ
साहित्य संमेलनाच्या
बरोबरीने विविध
प्रवाही साहित्य
संमेलने, लेखिका,
युवा आणि बाल
साहित्य संमेलनाचेही
आयोजन केले
जाते.
* १४ जानेवारी
हा विदर्भ साहित्य
संघाचा वर्धापनदिन.
वर्धापनदिनाच्या
पर्वावर सुप्रसिध्द
साहित्यिकाच्या
व्याख्यानाचे
आयोजन केले
जाते. तसेच
साहित्याच्या
काव्य, कथा,
समीक्षा, ललित
लेखन, प्रवासवर्णन
व बाल साहित्य
आदी प्रकारातील
उत्कृष्ट लेखनाला
रुपये ५०००/-
पुरस्कार देण्यात
येतो.
साहित्यिकांची
नावे
१) ग.त्र्यं.
माडखोलकर स्मृती
जीवनव्रती पुरस्कार
२) वामनराव
चोरघडे स्मृती
कथा पुरस्कार
३) वा.वि. मिराशी
स्मृती वैचारिक
लेखन पुरस्कार
४) पु.य. देशपांडे
स्मृती कादंबरी
पुरस्कार
५) शरच्चंद्र
मुक्तिबोध स्मृती
काव्य पुरस्कार
६) कुसुमानिल
स्मृती समीक्षा
पुरस्कार
७) य.खु. देशपांडे
स्मृती शास्त्रीय
लेखन पुरस्कार
८) अण्णासाहेब
खापर्डे स्मृती
आत्मचरित्र
लेखन पुरस्कार
९) राष्ट्रसंत
तुकडोजी महाराज
स्मृती चरित्र
लेखन पुरस्कार
१०) व.कृ. वऱ्हाडपांडे
स्मृती विशेष
पुरस्कार
११) नवोदित
लेखन पुरस्कार
: एकूण दोन
१२) पां.ब.
गाडगीळ स्मृती
'युगवाणी लेखन'
पुरस्कार
नवोदितांच्या
साहित्यालाही
पुरस्कार देण्यात
येतो. त्याचबरोबर
वृत्तपत्रातील
उत्तम कामगिरीबद्दल,
एकांकिका लेखन,
युगवाणीतील
उत्तम लेखन
यासही पुरस्कार
देण्यात येतात.
हे पुरस्कार
विदर्भातील
मान्यवर दिवंगत
साहित्यिकांच्या
नावे दिले जातात.
* विदर्भ साहित्य
संघाचे विद्वतरत्न
कै. भाऊजी दफ़्तरी
स्मृती संदर्भ
ग्रंथालय आहे.
मराठी विषयातील
संशोधकांसाठी
४० हजारांवर
संदर्भ ग्रंथांनी
समृध्द असे
हे ग्रंथालय
आहे.
* मराठी भाषेच्या
प्रचार प्रसाराचे
विदर्भ साहित्य
संघाचे उद्दिष्ट
दृष्टीसमोर
ठेऊन १९४६ पासून
मराठी विषयाच्या
परीक्षा सातत्याने
आजपर्यंत घेण्यात
येतात. ज्यात
शालेय स्तरापासून
डि.लिट(साहित्य
वाचस्पती) समकक्ष
परीक्षांचे
काळाची गरज
लक्षात घेऊन
त्यानुसार अभ्यासक्रम
आखून आयोजन
करण्यात येते.
* अ- मराठी
भाषिकांमध्येही
मराठी भाषेची
रुची वाढावी
यासाठी विदर्भ
साहित्य संघाने
सातत्याने प्रयास
केले. अन्य
भाषाभगिनींना
साहित्य संघाशी
जोडून घेतले.
२५ वर्षांपासून
उर्दूचे वर्ग
विदर्भ साहित्य
संघात चालविले
जात आहेत. ८०
व्या अखिल भारतीय
मराठी साहित्य
महामंडळाच्या
विदर्भ साहित्य
संघ आयोजित
संमेलनपर्वावर
'व्यावहारिक
अरेबिक'चे वर्ग
सुरु केले आहेत.
* 'युगवाणी'
हे विदर्भ साहित्य
संघाचे मुखपत्र.
कै.वा.ना. देशपांडे,
कथाकार वा.
कृ.चोरघडे,
कवी 'ग्रेस',
प्रकाश देशपांडे,
डॉ. श्रीपाद
भालचंद्र जोशी,
डॉ. सुलभा हेर्लेकर
यांसारखे कुशल
संपादक युगवाणीला
लाभले. कवी
प्रा.नारायण
कुळकर्णी कवठेकर
युगवाणीचे विद्यमान
संपादक आहेत.
* विदर्भ साहित्य
संघाचे सांस्कृतिक
संकुल हा एक
महत्वाकांक्षी
प्रकल्प. भव्य
रंगमंदिर, व्याख्यान
कक्ष, प्रशस्त
ग्रंथालय, कलादालन,
रेकॉर्डिंग
कक्ष व अतिथीगृह
आदींनी सुसज्ज
असे भव्य सांस्कृतिक
संकुल.
* १९६० साली
अखिल भारतीय
मराठी साहित्य
महामंडळाची
स्थापना झाली.
त्यात 'साहित्य
परिषद', पुणे,
'मराठवाडा साहित्य
परिषद', औरंगाबाद,
'मुंबई मराठी
साहित्य संघ',
मुंबई आणि 'विदर्भ
साहित्य संघ',
नागपूर ह्या
घटक संस्था
असून 'मध्यप्रदेश
साहित्य संघ',
भोपाळ, 'मराठी
साहित्य परिषद'
आंध्रप्रदेश,
'कर्नाटक राज्य
मराठी साहित्य
परिषद', गुलबर्गा,
'गोमांतक साहित्य
सेवक मंडळ',
पणजी, 'छ्त्तीसगड
मराठी साहित्य
परिषद', बिलासपूर
या समाविष्ट
संस्था आहेत.
तसेच महामंडळाची
संलग्न संस्था
म्हणून बडोदे
येथील 'मराठी
वाङमय परिषद'
आहे.
|