नागपूरच्या
अवतीभवती सुमारे
४० किलोमीटरच्या
परिसरात महाकवी
कालिदासाच्या
'मेघदूत' संबंधाने
प्रसिध्द असलेले
रामटेक, खिडसी
येथील रमणीय
पर्यटन स्थळ,
आद्य मराठी
ग्रंथ 'विवेकसिंधू'
लिहिणाऱ्या
मुकुंदराजाच्या
नावे प्रसिध्द
व तीन नद्यांच्या
संगमावर असलेले
निसर्ग समृध्द
श्रीक्षत्र
आंभोरा ही नागपूर
जिल्ह्यातील
प्रसिध्द प्रेक्षणीय
स्थळे आहेत.
नागपूर परिसरातच
भारतरत्न डॉ.बाबासाहेब
आंबेडकर ह्यांचे
केंद्रीय स्मारक
असलेला दीक्षाभूमीरील
आंतराष्ट्रीय
ख्यातीचा भव्य
बौध्द स्तूप,
सूमारे १२ किलोमीटर
अंतरावरील कामठी
येथील जपानी
वास्तुकलेच्या
पध्दतीचा प्रसिध्द
ड्रगन पालेस,
सुमारे ६ किलोमीटर
अंतरावरील प्रख्यात
कोराडी येथील
देवीचे देवस्थान,
२.५ किलोमीटर
अंतरावरील रमण
सायन्स म्युझियम,
नागपूरचे पुरातन
वास्तुसंग्रालय,
फ़ुटाळा तलावाच्या
बाजुचे संमेलन
स्थळापासून
१.५ किलोमीटर
अंतरावरील आधुनिक
बोटनिकल गार्डन,
संमेलन स्थळापासून
सुमारे ६ किलोमीटर
अंतरावर असलेला
प्रख्यात संत
ताजुद्दीन बाबा
ह्यांचा दर्गा
ह्याशिवाय नागपूरातील
ब्रिटीशकालीन
तसेच भोसलेकालीन
वास्तुशिल्पचा
देखणा नमुना
असलेल्या इमारती
ही नागपुरातील
काही
प्रेक्षणीय
स्थळे बघण्यासारखी
स्थळे आहेत.
रिजर्व्ह बॅंक
ताजबाग
हायकोर्ट
ताडोबा अभयारण्य
लोणार
नगरधन
आनंदवन
हेमलकसा
मार्कंडा
तसेच नागपूरपासून
वेगवेगळ्या
अंतरावर सेवाग्राम,
पनार,बाबा आमटेंचे
वरोरा येथील
'आनंदवन',ताडोबा
अभयारण्य,भामरागड, हेमलकसा,मार्कंडा,विदर्भातील अष्टविनायक,
पेंच, तोतलाडोह
धरण, कान्हा
किसलीचे अभयाण्य,
मेळ्घाट, चिखलदरा,
अशी विविध पर्यटन
स्थळेही आहेत.
या स्थळांना
ज्यांना भेटी
द्यायच्या असतील
त्यांनी स्वतंत्रपणे
हांडा ट्व्हल्स
, नागपूर (०७१२)
२७४६६१७, ९३७०९९८९९७/९३७०९९६६७४
यांच्याशी संबंध
साधावा.संमेलनाच्या
निमित्तने येनाऱ्या
प्रतिनिधींना
ह्या स्थळांना
भेटी देता येऊ
शकतील. महाराष्ट्र
शासनाचे पर्यट्क
स्वागत केंद्रही
नागपूरात सुरु
होत असून ते
संमेलन स्थळाल
लागूनच असलेल्या
इमारतीत सुरु
होत आहे.
Copyright
2006-2007. Vidarbha Sahitya Sangha .All rights reserved.