Site is Sponsered by
 
Shewalkar Developers Ltd.
 

 * भारताच्या नकाशात ह्र्दयस्थानी असलेले महत्वाचे, सर्वांग सुंदर, गौरव संपन्न इतिहासाची परंपरा लाभलेले शहर. शहराने पौराणिक, ऐतिहासिक, राजकीय, व्यावसायिक क्षेत्रात आपले नाव सुवर्णाक्षरात नोंदवले आहे.

 

* गोंड राजा बख्त बुलंदशहाने वसविलेले शहर पूर्वी'नागपूर' या नावाने ओळखले जायचे. १८व्या शतकात देवगडच्या गोंड राजाने प्रथम राजधानीचा दर्जा दिला. सन १७४३ साली पहिले रघुजीराजे भोसले यांनी राज्य कारभाराचे केंद्र केले आणि ह्या शहराने 'भोसल्यांची राजधानी' म्हणून बहुमान घेतला. 'सन १८६१ साली ब्रिटिशांनी या शहराला त्या काळाच्या मध्यप्रांताच्या राजधानीचा दर्जा दिला.'

 

* इतिहास प्रसिद्ध नागपूर शहरात सन १८६४ साली 'नगर पालिका' स्थापन झाली. १९३७ मध्ये सुधार प्रन्यास अस्तित्वात आले.

 

* संत्रानगरी नागपूर स्थापन होऊन ३०० वर्षे झाली.

 

* सन १९५६ साली राज्यपुर्नरचनेनुसार पूर्वीचा मध्यप्रांत व वऱ्हाड यांचे फ़ारकत होऊन महाकोशल भाग मध्य प्रांतात आणि वऱ्हाडची भूमी महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात आली. परिणामस्वरुप नागपूरची राजधानी संपुष्टात येऊन या शहराला उपराजधानीचे दुय्यम स्वरुप प्राप्त झाले.

 

* भारताची पर्यायी वैकल्पित राजधानी म्हणून नागपूरची भारताच्या गृह मंत्रालयात नोंद आहे.

 

* नागपूर हे 'कॉस्मोपॉलिस' शहर असून 'एक ह्र्दय हो भारत जननी' चे प्रत्यंतर नाग्पुरात दिसून येते.

 

* विदर्भ साहित्य संघ, राष्ट्रभाषा प्रचार समिती, हिंदी मोरभवन, कर्नाटक संघ, आंध्र असोसिएशन ह्यासारख्या संस्था संस्कृतीची जोपासना व संवर्धनासाठी प्रयत्नशील आहेत.

 

* १४ ऑक्टोबर १९५६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 'धर्मपरिवर्तना'संबंधीची घोषणा नागपूरातच झाली. त्यामुळे 'दीक्षाभूमीला' धार्मिक श्रध्देचे महत्व प्राप्त झाले.

 

* शैक्षणिकदृष्ट्या नागपूर हे विदर्भातील पुढारलेले शहर आहे. कला, वाणिज्य, कृषी, विज्ञान, स्थापत्य, वैद्यकीय शिक्षण संस्था नागपुरात आहेत. याव्यतिरिक्त नॅशनल फायर इंजिनियरिंग कॉलेज, इन्कमटॅक्स ट्रेनिंग कॉलेज ह्या उल्लेखनीय संस्था नागपुरात आहेत.

 

* नागपूर व परिसर शेती प्रधान असून कापूस, तांदूळ, गहू, हरभरा, मिरची ही येथील प्रमुख पिके आहेत.

 

* आकार, रंग व स्वाद ह्यासाठी अद्वितीय म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या नागपुरी संत्र्यांची कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते.

 

* नागपूर 'ऑरेंज सिटी' म्हणून प्रसिद्ध आहे.

 

* एम्प्रेस मिल्स, मॉडेल मिल्स, सहकारी सूत गिरणी आदि प्रसिद्ध आहेत.

 

* नागपूर शहर लोहमार्ग व वायुमार्गाने भारतातील बहुतेक प्रमुख शहरांशी जोडले आहे.

 

* 'ग्रीन सिटी' म्हणून नागपूरचा दुसरा क्रमांक आहे. अंबाझरी, सेमिनरी हिल्स, तेलंगखेडी, महाराजबाग, ही उद्याने नागपूर नगरीला वैभव प्रदान करणारी आहेत.

 

* नागपुरात अलिकडे स्थापन झालेले 'दक्षिण मध्य भारतातील सांस्कृतिक केंद्र' आणि 'रमण विज्ञान केंद्र' ही 'ज्ञानकेंद्रे' शहराच्या गौरवात भर घालणारी आहेत.

 

* श्री. पाताळेश्वर मंदिर, श्री. पोद्दारेश्वर राम मंदिर, श्री. साईबाबा मंदिर, श्री. निकालस मंदिर, जैन मंदिर, इंदोरा बुध्द विहार, मस्जीद, पारसी अग्यारी, झुलेलाल मंदिर हे शिल्पकलेचे उत्तम नमुने आहेत.

 

* जुने सचिवालय, विधान भवन, उच्च न्यायालय, आयुर्विज्ञान महाविद्यालय, महात्माफुले मार्केट, कस्तुरचंद पार्क, शिवराज लिथो ऑफसेट आदि वास्तु स्थापत्यकलेच्या दृष्टीने उत्कृष्ट आहेत.

 

* सिताबर्डी किल्ला, विधान भवन, महाराज बाग, मध्यवर्ती अजायबघर, झाशीची राणी लक्ष्मीबाईंचा पुतळा, गीता मंदिर, विद्यापिठ परिसर, कस्तुरचंद पार्क, दीक्षाभूमीवरील स्तूप, रमण विज्ञान केंद्र, डॉ. हेडगेवार स्मारक, राष्ट्रपिता महात्मा गांधी विहार इत्यादी स्थळे चिरस्थायी स्मृती जागवणारी आहेत.

Copyright 2006-2007. Vidarbha Sahitya Sangha .All rights reserved.